रविवार, १० जुलै, २०२२


शनिवार, २१ जून, २०१४

माहित आहे मला
 जेव्हा सहचरी म्हणुन 
कर्तव्याची वेळ येईल तेव्हा 
पत्निसाठीची कर्तव्ये पार पाडशील 

माहित आहे मला 
नैतिक जबाबदारी 
सांभाळायची वेळ येईल तेव्हा 
मुलांसाठीची कर्तव्य पार पाडशील 


माहित आहे मला 
सामाजिक कर्तव्याची वेळ येईल तेव्हा 
समाजासाठी
चांगली कामे करशील 


माहित आहे मला 
मैत्र सांभाळायची वेळ येईल तेव्हा 
मित्रांसाठी
जिवाचे रान करशिल 

पण जेव्हा तुला 
स्वतःसाठी जगायची 
वेळ येईल तेव्हा 
मला स्वतः मध्ये मिसळुनच तु 
स्वतःसाठी जगशिल 

कारण मला माहीत आहे 
मला वजा करुन 
तुझे मी पण
पुर्ण होवुच शकत नाही 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: